Ladki Bahin Yojana E KYC List 2026:मोठी बातमी ! लाडक्या बहिणींना एकदम मिळणार ६००० रुपये; ई-केवायसी, दुरुस्ती, संशयित लाभार्थीची पडताळणी सुरू; सरकारने दिली ‘या’ तारखेपर्यंत मुदत
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थीना ‘ई-केवायसी’ बंधनकारक आहे. पण, ‘ई-केवायसी’ करताना झालेल्यांना त्रुटी दुरुस्तीसाठी पर्याय खुला करून दिला आहे. दुसरीकडे ‘ई-केवायसी’ राहिलेल्या महिलांसाठी मुदतवाढही दिली आहे. तसेच संशयित लाभार्थीची अंगणवाडी सेविकांमार्फत पडताळणीही सुरू आहे. ही सर्व प्रक्रिया ३१ मार्चपर्यंत पूर्ण करण्याचे शासनाचे आदेश आहेत.
लाडकी बहीण योजनेतील लाभार्थीना प्रत्येक महिन्याच्या १० तारखेपर्यंत लाभ वितरित होईल, असा शासन निर्णय झाला आहे. राज्यातील सव्वादोन कोटी पात्र लाडक्या बहिणींसाठी दरमहा सरासरी ३२०० कोटी रुपये लागतात. मात्र, डिसेंबरपासून लाडक्या बहिणींसाठी निधी मिळालेला नाही. आता ज्या लाडक्या बहिणींची ई-केवायसी परिपूर्ण तथा अचूक झाली आणि निकषांनुसार त्या योजनेच्या लाभासाठी पात्र ठरत असतील तर त्यांना लाभ मिळेल, अशी चर्चा आहे.
पण, ई-केवायसी अचूक असलेल्यांमध्ये हजारो लाभार्थी २१ वर्षांखालील आहेत, काही ६५ वर्षांवरील आहेत, काहींचा मृत्यू झाला आहे. अशी नावे योजनेतून कायमची हटविण्याचीही कार्यवाही सुरू आहे. तत्पूर्वी, त्यांची अंगणवाडी सेविकांकडून घरोघरी जाऊन पडताळणी केली जात आहे. त्यामुळे ई-केवायसी, त्यातील दुरुस्ती व पडताळणी पूर्ण झाल्यावरच पात्र लाडक्या बहिणींचे पैसे वितरित होतील, असे वरिष्ठ अधिकारी सांगत आहेत.
मुदतीत ई-केवायसी करावी
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ई-केवायसी आणि ई-केवायसीतील त्रुटी सुधारण्यासाठी ३१ मार्च २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. अनेक लाभार्थीनी चुकीचे पर्याय निवडल्यामुळे पात्र महिलांचे पैसे अडकले होते. त्यांनी मुदतीत चूक दुरुस्ती करावी.
– नयना गुंडे, आयुक्त, महिला व बालविकास, पुणे
निकषांनुसार अपात्र ठरणाऱ्यांची संख्या मोठी
लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थीच्या कुटुंबाचे वार्षिक अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे, त्यांच्याकडे चारचाकी वाहन नसावे, ती सरकारी नोकरदार नसावी, एकाच कुटुंबातील दोन लाभार्थी (एक विवाहित व एक अविवाहित) असाव्यात, लाभार्थीचे वय २१ ते ६५ वर्षांपर्यंतच असावे, अशा प्रमुख अटी आहेत. मात्र, योजनेच्या निकषांना फाटा देऊन अनेक महिलांनी लाभ घेतला. आता ई-केवायसी व पडताळणीअंती अपात्र ठरणाऱ्या लाडक्या बहिणींची संख्या खूप मोठी असू शकते, असे मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.
सोलापूर जिल्ह्यातील लाडक्या बहिणींची स्थिती
एकूण लाभार्थी
११,३०,५६३
दरमहा लागणारा निधी
१६९.५८ कोटी
पडताळणीत लाभार्थी कमी
अंदाजे २ लाख
सध्या पडताळणी सुरू
१,१७,५५०
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू करण्यात आलेल्या या योजनेत राज्यातील महिलांना दरमहा १५०० रुपयांची आर्थिक मदत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. या योजनेला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला असून, महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाच्या दृष्टीने हा महत्त्वाचा उपक्रम मानला जातो.
निवडणुकीत या योजनेचा महायुती सरकारला राजकीय लाभझाल्याचेही चित्र दिसून आले. मात्र, ई-केवायसी प्रक्रियेमुळे अनेक लाभार्थ्यांना नियोजित वेळेत हप्ते मिळाले नाहीत, त्यामुळे नाराजीचे वातावरण निर्माण झाले होते.
ई-केवायसी पूर्ण न झाल्यामुळे अनेक महिलांचे हप्ते थांबले
मुंबई – राज्यातील महिलांसाठी राबविण्यात येत असलेल्या लाडकी बहीण योजनेतील लाभार्थीना मोठा दिलासा देणारी माहिती महिला व बालविकास विभागाकडून समोर आली आहे. ई-केवायसी प्रक्रियेमुळे अनेक महिलांचे थकित राहिलेले तीन महिन्यांचे हप्ते आता एकत्रित स्वरूपात देण्याचा निर्णय सरकारने घेतला असल्याचे कळत आहे.
होते. काही महिलांनी आवश्यक कागदपत्रे आणि प्रक्रिया पूर्ण करूनही त्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नव्हते.
त्यामुळे महिलांनी संबंधित कार्यालयांमध्ये जाऊन नाराजी व्यक्त केली. काही ठिकाणी तर लाभार्थी महिला रस्त्यावर उतरून आंदोलन करतानाही दिसून आल्या. पैसे का येत नाहीत, याबाबत स्पष्टता नसल्याने महिलांमध्ये संभ्रम आणि असंतोष वाढत होता.
या पार्श्वभूमीवर महिला व बालकल्याण विभागाने संबंधित अधिकाऱ्यांना लाभार्थी महिलांच्या घरी जाऊन चौकशी करण्याचे आदेश दिले होते. नियम आणि अटी डावलून सादर झालेल्या अर्जाची पडताळणी सध्या सुरू आहे. यामुळे लाभार्थीची माहिती तपासून योग्य पात्र महिलांपर्यंत लाभ पोहोचवण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून केला जात आहे. या सर्व प्रक्रियेनंतर आता थकित हप्ते एकत्र देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.
या निर्णयानुसार पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात थेट ४५०० रुपये जमा केले जाणार आहेत. ज्यांचे नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यांचे हप्ते थकले होते, त्यांना जानेवारीसह एकत्रित रक्कम दिली जाईल. तर काही महिलांना यापूर्वीच दोन महिन्यांचे हप्ते मिळाले असल्यास, त्यांना जानेवारी महिन्याचा